21.7 C
New York

Sanjay Raut : काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर हायकमांड निर्णय घेईल; संजय राऊतांची टीका

Published:

नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून यासाठी येत्या काही दिवसाता यासंदर्भात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी मुख्य लढत होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून वाद होताना दिसत आहे. एककडी शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही दावा होताना दिसत आहे. विदर्भात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपद नाना पटोले यांना देण्यात यावं नाही, तर आम्ही हिसकावून घेऊ, असे वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut criticized that the High Command will decide on the role of the Chief Minister of Congress)

विदर्भातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षात अशाप्रकारची भूमिका असेल तर त्यासंदर्भात त्यांचे जे हायकमांड आहेत. राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे ते त्या संदर्भात निर्णय घेतील. हिसकावून घेऊ असं काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून अडचणीत आणणारं आहे. कारण आघाडीत अद्याप कोणी काही बोलताना दिसत नाहीय, असे राऊत म्हणाले.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; संभाजीराजे उपोषणस्थळी जाणार

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा ठरवायला पाहिजे. जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असले, तर आम्ही त्याचं समर्थन करू. ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ असं ठाकरे गट किंवा शरद पवार गट असं म्हणत नाही आहे. त्यामुळे ज्या नेत्यासंदर्भात अशाप्रकारचं वक्तव्य केलं जातं, त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात. नाना पटोले काँग्रेस पक्षाचे संयमी आणि निस्वार्थी नेते आहेत. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याच काम करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img