19.1 C
New York

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा

Published:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आज वर्धा जिल्ह्याच्या त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला त्यासोबतच राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्धा दौऱ्यावर येत आहेत. आज साधारण पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर लगेचच ते हेलिकॉप्टरने वर्ध्यात येतील. यानंतर पंतप्रधान मोदी हे स्वावलंबी मैदानावर पोहोचतील. यावेळी ते विविध योजनांचे लोकार्पण करतील. १२.३० च्या सुमारास या कार्यक्रमानंतर साधारण पंतप्रधान मोदी यांचे भाषण होईल. यानंतर १ च्या सुमारास मोदी हे वर्ध्यातून हेलिकॉप्टरद्वारे नागपुरात रवाना होतील आणि त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.

 Narendra Modi स्वावलंबी मैदानावर कार्यक्रम

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती येथील पी एम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ होणार आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पी एम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना या योजनेचा प्रातिनिधिक स्वरुपात लाभ दिला जाणार आहे.

महायुतीमध्ये 80 टक्के जागा वाटप फायनल !

 Narendra Modi मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार

अमरावतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ देखील होणार आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. पीएम मित्र टेक्सटाईल पार्कमुळे अमरावतीच्या प्रकल्पात 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. 3 लाख लोकांना यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. याचा फायदा विदर्भातील युवकांना होणार आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यानंतर येत्या २६ सप्टेंबरला पोहरादेवी येथे विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img