21.7 C
New York

Onion Exports : कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Published:

देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची (Onion Exports) बातमी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलं आहे. किमान 550 डॉलर निर्यात मूल्य कांदा निर्यातीवरील हटवलं आहे. मात्र 40% निर्यात शुल्क बाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकाच दिवसात दोन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता कांद्याला काय बाजार भाव मिळणार?, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. किमान निर्यात मूल्य ( MEP) काढून टाकलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची खुल्या पद्धतीनं निर्यात करू शकतील. ज्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Onion Exports मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना मी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते, असं शिंदे म्हणाले.

कांदा ग्राहकांना रडवणार?

मी देखील या संदर्भामध्ये केंद्राला विनंती केली होती. किमान निर्यात शुल्क (५५० डॉलर्स प्रति मेट्रिक टन ) हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img