19.1 C
New York

Thackeray group : …ही मोदींसाठी लाजिरवाणी गोष्ट, ठाकरे गटाचा घणाघात

Published:

चीन अरुणाचल सीमेवर सातत्याने घुसखोरी करीत आहे इतकेच नव्हे, तर अरुणाचल चीनचेच आहे असा त्याचा दावा आहे. (Thackeray group) मोदी सरकार आल्यापासून चीन सर्वात जास्त भारताच्या सीमा कुरतडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभ्रमणास जातात, जगभरच्या नेत्यांच्या गळाभेटी घेतात, पण त्यांना भारताच्या कुरतडलेल्या सीमांची काळजी घ्यायला वेळ नाही. शेकडो किलोमीटर जमीन चीन भारतात घुसून ताब्यात घेत असेल तर ही मोदी यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group criticizes Modi over intrusion in Arunachal Pradesh)

मोदी हे जगाचे मजबूत नेते किंवा विश्वगुरू वगैरे आहेत, पण चीन तसे मानायला तयार नाही. मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून चीनचे सैन्य कधी अरुणाचल, तर कधी लडाखच्या हद्दीत घुसखोरी करत आहे. लडाखच्या हद्दीत घुसून चीनने हेलिपॅड, गावे वसवली तरी सरकारची चीनवर डोळे वटारण्याची बिशाद नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे. पंतप्रधान मोदी सध्या रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या कार्यात गुंतून पडले आहेत आणि इकडे चीन अरुणाचल प्रदेशातील कपापू भागात घुसला आहे. चीनचे सैन्य आठ दिवसांपूर्वीच आपल्या हद्दीत घुसले. तेदेखील साठ किलोमीटर आत. हे चित्र भयंकर असताना आपल्याकडून चीनचा साधा निषेधही झाला नाही. दोन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परंपरेप्रमाणे पाकिस्तानला दम भरला, पण आत घुसलेल्या चीनवर संरक्षणमंत्री बोलत नाहीत, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

मणिपुरात परिस्थिती गंभीर! इंटरनेट ठप्प, संचारबंदी लागू

चीनने बाजूचे नेपाळ गिळले आहे. चीनचे आरमार मालदीवच्या समुद्रात उभेच आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून चीनने त्यालाही आपल्या टाचेखाली आणले आहे. पाकिस्तानने चीनलाच आपला बाप मानले आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या जवळ जवळ सर्वच शेजाऱ्यांना ताब्यात घेऊन चीनने हिंदुस्थानच्या सीमांवर स्वतःचे चौकी-पहारे बसवले आहेत. एकही शेजारी आपला मित्र नाही व पंतप्रधान मोदी सातासमुद्रापलीकडील राष्ट्रप्रमुखांच्या गळाभेटी घेत आहेत. परराष्ट्र धोरणातला हा ‘लोच्या’ असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही अत्यंत घातक बाब असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img