10 C
New York

Deepika Padukone : दीपवीरच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवलं नाव….

Published:

Deepika Padukone : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या घरी एक गोंडस परीचे आगमन झाले .नवीन चिमुकलीच्या येण्याने सर्व जण आनंदी आहेत. दोघांनी नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोड बातमी जाहीर केली. ही बातमी जाहीर केल्यावर अनेक सेलिब्रेटींनी तसेच चाहत्यांनी त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव देखील केला. मुलीला जन्म दिल्यावर सर्वीकडे आनंदच वातावरण तर आहेच पण, यानंतर मुलीचं नाव रणवीर आणि दीपिका काय ठेवणार याकडे चाहत्यांच लक्ष लागलय.

मात्र, या जोडप्याने आता आपल्या लेकीचं नाव ‘रविका’ असे ठेवावे असे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सूचविले आहे.काही फोटो सध्या सोशल मीडियावर दीपिकाच्या लेकीसोबतचे व्हायरल झाले आहेत. खरोखरच ते फोटो दीपिकाच्या बाळाचेच आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र हे फोटो दीपिका आणि तिच्या बाळाचे नाहीत असं आता समोर आलय. दीपिका ही व्हायरल फोटोत रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसत असून, तिच्या मांडीवर बाळ देखील दिसत आहे.

…तर फडणवीसांच्या फौजा आमच्यावर तुटून पडल्या असत्या; संधी मिळताच राऊतांनी घेरलं

अन्य जोडप्यांप्रमाणेच चाहते त्यांना आता दीपवीर म्हणतात. दीपवीर हे नाव दीपिकामधील दीप आणि रणवीरचा वीर या शब्दाचा वापर करून नाव तयार केले आहे. पण, या हॅशटॅगचा ट्रेंड मुलीचे नाव ठेवताना फॉलो करायला नको, अशी चाहत्यांची इच्छा आहे. अनेक लोकप्रिय जोडप्यांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आहे, विराटमधील ‘व’ आणि अनुष्कातील ‘का’ हे अक्षर घेऊन तिचे नाव ठेवण्यात आले. आता दीपिका आणि रणवीर आपल्या लेकीचे नाव काय ठेवतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img