Thane : बदलापूरमध्ये मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलीयं.वाढदिवसाच्या पार्टीत गुंगीचे औषध देऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेत.आपल्या मैत्रिणीकडे बढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच ओळखीतल्या दोन तरुणांनी गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मैत्रिणीसह अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक केलीय.
पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी बदलापूर पूर्व भागात शिरगांव येथे राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरुणीसोबत ओळख झाली होती. भूमिका हिने आपल्या वाढदिवसासाठी पीडित तरुणीला दोन दिवसांपूर्वी तसेच तिच्या दोन मित्रांना आपल्या घरी बोलावले. मात्र पीडित तरुणीच्या पेयात पार्टीदरम्यान भूमिकाने गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर तरुणीसोबत तिच्या घरी आलेल्या इतर दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला.
निवृत्तीचा डाव सोळंकेंच्या अंगलट येणार? धनुभाऊंच्या डोक्यात वेगळचं नाव
मात्र आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी भूमिकाला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्य प्राशन करून येथे पडल्याचे तिने सांगितले.त्यामुळे घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणी आपले पालक आणि पोलिसांना सांगितले. तरुणीची वैद्यकीय चाचणी पोलिसांनी केली असता तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न होताच, तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम, सातारा येथून आलेला शिवम राजे (२२) आणि संतोष रुपवते (४०) या तिघां विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.