21.7 C
New York

Nitesh Rane : हे तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल; नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार

Published:

ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीसांना शंभर जन्म देखील कळणार नाही, अशी टीका राऊतांनी केली. त्यांच्या या टीकेवर आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) जोरदार पलटवार केला. फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुमच्या मालकांना चांगलंच कळालं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो, हे तुझ्या मालकांना विचार, अशी टीका राणेंनी केली. फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत, असंही राणे म्हणाले.

एका मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असं वक्तव्य केलं. त्यावरून राऊतांनी फडणवीसांवर टीका केली होती. राऊतांनी केलेल्या टीकेविषयी नितेश राणेंना विचारले असता ते म्हणाले, फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुमच्या मालकांना चांगलंच कळालं असेतल. त्यांचा मेंदू कसा चालतो, हे तुझ्या मालकांना विचार, अशी टीका राणेंनी केली. फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत, असंही राणे म्हणाले.

महाविकास आघाडीत चौथा भिडू? एमआयएमकडून प्रस्तावाबरोबर अल्टिमेटमही…

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरही संजय राऊतांनी जोरदार टीका केली होती. ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले, अनेक संस्था गुजरातमध्ये पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजाही गुजरातमध्ये पळवतील, अशी टीका राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेविषयी विचारले असता राणे म्हणाले की, अमित शाह हे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईत येतात. ते तुमच्या साहेबांसारखे फक्त अंबानींच्या घरातच जात नाही. तर ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही बळ देतात. राणे पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुका व्हाव्या, असं वाटतं असेल तर तुम्ही कोर्टात दाखल केलेल्या पिटिशन मागे घ्या.

Nitesh Rane राऊत काय म्हणाले होते?

शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे फडणवीसांना कळाले असते, तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती.शरद पवारांच्या मनात काय सुरू आहे, हे तुम्हाला शंभर जन्मही कळणार नाही. कोणाचे नाव आहे, कोणाचे नाव नाही? 2019 मध्येही पवारांच्या डोक्यात काय चालले होते हे फडणवीसांना कळले नव्हते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा टोला राऊतांनी लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img