15.6 C
New York

Sanjay Raut : या सरकारचा शेतकरी लाडका कधी होणार? राऊतांचा सवाल

Published:

मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यात 5 लाख 8 हजार 68 हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं. याचा जिल्ह्यातील 6 लाख 20 हजार 980 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याचपार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठावाडा दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. (Sanjay Raut criticism of the government saying that when will farmers be loved)

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकारकडे इतर सर्व वायफळ कामासाठी पैसे आहेत. पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो, त्याच आयुष्य वाहून जातं तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे, असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही. पाच पंचवीस खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी, नुकसान भरपाईसाठी द्यावेत ही या सरकारची भावना किंवा मानसिकता नाही, अशी सडकून टीका त्यांनी केली. संजय राऊत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्याला धीर देण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वत: असे त्या ठिकाणी जात आहोत.

एसटी कर्मचाऱ्याच्या संपावरून गुणरत्न सदावर्तेंचा महाविकास आघाडीवर निशाणा

मराठवाड्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि त्याच्या घरापर्यंत पोहचून त्याचं दु:ख, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या नुकसानीची माहिती घेण्यासंदर्भात आजचा कार्यक्रम आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगरला उतरून दौरा आम्ही सुरुवात करू आणि तिथून नांदेडपर्यंत पुढे जाऊ, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मराठवाड्यातील मागील तीन दिवसांपासून परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याच्या सूचना उशिरा दिल्या असं वाटतं का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, खंर तर त्यांच्या पक्षावर मोठी आपत्ती कोसळलेली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्दैवाने जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे. त्या आपत्तीतून सावरायला त्यांना वेळ नाही. तिथेच त्यांच आपत्ती व्यावस्थापन फेल झालं आहे.

आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा दौरा जाहीर करताच मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली. यामुळे पंचनामे, नुकसान भरपाई हे त्यांनी सुरू केलं आहे. पण हे सर्व ढोंग असल्याचं शेतकऱ्यांना माहीत आहे. हे वारंवार गेल्या अडीच वर्षात घडलेलं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की, त्यांना शेकऱ्यांच्या बाबतीत जाग येते. खरं तर या राज्यातील विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि सामाजिक न्याय विभागाचा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवर आफत आली आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img