ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचारी संघटनेने उद्यापासून राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले आहे. खाजगीकरण, आर्थिक बाबी अशा विविध मागण्या आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने देत एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे.
लाल परी उद्यापासून ठप्प
आज २ सप्टेंबर 2024 रोजी राज्यभर एसटी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, म्हणून उद्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. आज दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रल येथील कृती समितीच्या वतीने द्वारसभा निदर्शने आयोजित केले असून यावेळी सरकारला शेवटचा इशारा देण्यात आलाय. अन्यथा राज्यभर तीन सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.
कंगनाच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली
एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळायलाच पाहिजे, वाढीव घरभाडेभत्ता व फरक, प्रलंबित महागाई, खाजगीकरण बंद करा, जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा अशा विविध एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.