देशात कृषीविषयक धोरण राबवताना केंद्र सरकारकडून (Farmers Scheme) महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून कृषी संबंधित उपक्रमांना चालना देण्यासाठी एकूण 13,966 कोटी रुपयांना मंजुरी दिलीयं. यामध्ये डिजिटल कृषी मोहिम, अन्न व पोषण सुरक्षा, पशुधन, फलोत्पादन, शिक्षण व्यवस्थापनाच्या विकासाला चालना देण्यासाठी निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिलीयं. दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री वैष्णव म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. याच धर्तीवर सर्वात आधी डिजिटल कृषी मोहिम असून विकसित केले जाणार आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर शेतीसाठी करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. डिजिटल प्रकल्पांसाठी एकूण 20, 817 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल कृषी मिशनची स्थापना करण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी स्पष्ट केलंय.
लय पवार घरी यायला लागले आहेत, मात्र…’ बारामतीकरांना अजित पवारांची साद
Farmers Scheme त्रिमंडळातील महत्वपूर्ण निर्णय कोणते?
- डिजिटल कृषी मोहिमेसाठी 2,817 कोटी रुपयांची मंजुरी
- अन्न, पोषण सुरक्षेसाठी 3,979 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी
- कृषी शिक्षण, व्यवस्थापन योजनेसाठी 2,291 कोटी रुपयांची मंजुरी
- फलोत्पादन योजनेसाठी 860 कोटी रुपये मंजूर
- पशुधन आरोग्य व्यवस्थापन योजनेसाठी 71,702 कोटी रुपये मंजूर
- कृषी विज्ञान केंद्राच्या विकासासाठी 1,202 कोटी रुपये मंजूर
- नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजनेसाठी 1,115 कोटी रुपये मंजूर