15.6 C
New York

Badlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट

Published:

बदलापुरात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. (Badlapur Case) या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. या घटनेनंतर बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले. मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला सुनावली आहे. अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानतंर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले.

Badlapur Case 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

यावेळी कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांपर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कोर्टात न्यायालयीन कोठडी मागितली होती. आरोपीवर पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवली आहेत. शाळेची मुख्याध्यापिका, अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपी फरार असल्याचे सांगितले आहेत, अशी माहिती वकिलांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती, आदित्य ठाकरेंचा घणाघात

Badlapur Case दोन सदस्यीय समितीची स्थापना

तर दुसरीकडे याप्रकरणी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बदलापूर अल्पवयीन लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या प्रणालीतील त्रुटींबाबत तपासणी करण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. दीपक केसरकर यांनी हा अहवाल मंत्री यांना सुपूर्द केला आहे.

Badlapur Case काँग्रेसची नवी मागणी

अत्याचाराची घटना घडलेल्या त्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे. त्यांच्या मदतीसाठी सल्लागार म्हणून अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर आणि नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शाळेच्या संचालक मंडळावर आता काँग्रेसच्या ठाणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष राजश्री भालेराव यांनी आक्षेप घेतला आहे.

नवीन शाळेचे संचालक विश्वनाथ पाटील हे भाजपचे कार्यकर्ते असून, त्यांच्या पत्नी सुवर्णा पाटील या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीत वार्ड क्रमांक २४ मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यामुळे आम्हाला विश्वनाथ पाटील यांच्यावर विश्वास नाही, कारण ही शाळा आधी आरएसएस आणि भाजपशी संबंधित लोकांकडून चालवली जातं होती, या शाळेत यापूर्वीही अशा घटना घडल्या असून त्या दडपल्या गेल्या आहेत. त्या भाजप आणि आरएसएसच्या लोकांवरती विश्वनाथ पाटील कारवाईला मदत करतील का असा प्रश्न उपस्थित करत विश्वनाथ पाटील यांना तात्काळ हटवावं, त्यांच्या जागी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या, निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img