17.6 C
New York

Big Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री? नव्या सदस्यामुळे समीकरण बदलणार?

Published:

बिग बॉस मराठीचा (Big Boss Marathi) यंदाचा सीझन प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडला आहे. या शो ने प्रेक्षकांचं पहिल्याच दिवसांपासून लक्ष वेधून घेतल आहे. या शो मध्ये आपल्याला कधी वाद, घरातली भांडण तर कधी अफलातून केमिस्ट्री ही पाहायला मिळत आहे. लवकरच आता बिग बॉसचा पाचवा आठवडा देखील सुरू होणार आहे. पण त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात नवीन सदस्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री देखील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा शो म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. हा शो प्रेक्षकांच्या मर्जीनुसारच चालतो. बिग बॉस मराठी मध्ये आता या शो चे निर्माते नवीन ट्विस्ट आणण्याच्या तयारीत असल्याचं सांगितला जात आहे. तसंच बिग बॉसच्या घरात या आठवड्याचे शेवटी घरात नवीन सदस्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचेही सांगितलं जात आहे. फेमस आर जे ही वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. याव्यतिरिक्त अभिजीत बिचुकले यांच्या नावाची ही वाइल्ड कार्ड सदस्यांसाठी चर्चा सुरू आहे.

सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सोशल मीडियावर देखील या सदस्यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक जण विविध व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करताना आपल्याला दिसतात. इंस्टाग्राम वरती आर जे सुमित हा देखील बिग बॉस मराठी च्या घरातील सदस्य संदर्भातील व्हिडिओ पोस्ट करतो. आर जे सुमित म्हणजेच रेडिओ जॉकी. त्यामुळे आर जे सुमितला बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून जाण्यासाठी नेटकऱ्यानी सुचवलं. सुमितनेही नंतर बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली. त्यामुळे यानंतर आता बिग बॉस मराठी च्या घरात सुमितची वाईल्ड् कार्ड एन्ट्री होणार असल्याचेही सांगितलं जात आहे.

तर दुसरीकडे, अभिजीत बिचुकले यांचं नाव बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीझन पासून चर्चेत होतं. म्हणून अभिजीत बिचुकले यांचीही वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

याशिवाय निक्की तांबोळी आणि जानवी किल्लेकर यांची बिग बॉस मराठी च्या घरात दादागिरी पाहता, या दोघींना टक्कर देण्यासाठी बिग बॉस मराठी च्या घरात राखी सावंत हिला आणा, अशी मागणी देखील बिग बॉस प्रेमींकडून होताना दिसत आहे. त्यामुळे तिसर नाव राखी सावंत बिग बॉस मराठी च्या घरात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री होणार असल्याचे बोलल जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img