19.2 C
New York

Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान

Published:

Raj Thackrey: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबदल भाष्य केलय. या योजनेबद्दल भविष्याविषयी चिंता व्यक्त करत असताना ‘पैसे कुठे आहेत सरकारकडे?’ असा सवाल त्यांनी उपस्तिथ केलाय, त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय. राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. दौरा संपल्यानंतर त्यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. या दरम्यान (Raj Thackrey)राज ठाकरेंना लाडकी बहीण योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही योजना आणखीन कित्ती दिवस चालेल. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

राज ठाकरे असे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पहिल्या महिन्यात मिळेल.दुसऱ्या महिन्यातही त्याच लाभ मिळेल. पण प्रत्येक महिन्यात वाटपासाठी पैसे कुठे आहेत सरकारकडे?असा प्रश्न त्यांनी उपस्तिथ केला. अजित पवार यांची मिमिक्री करत अजितदादांनी पण सांगितलं नाही का? निवडून दिले तर पुढचे हफ्ते मिळतील, पण असे काही होणार नाही.तुम्ही कित्ती पैसे वाटणार आहेत? पण सरकारकडे पैसे पाहिजेत ना या अजित पवारांच्या विधानाची त्यांनी आठवण करून दिली. याचीही राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

डणवीस म्हणाले,गृहमंत्री अन् पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाच मागण्या मी केल्या होत्या. यावर मी पाठपुरावा करण्यासाठी लवकरच पतंप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. आगामी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्वतंत्रपणे लढणार आहे. आम्ही कोणासोबतही युती करणार नाही, असे पुन्हा एकदा राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img