26.5 C
New York

Sharad Pawar : …..म्हणून सुरक्षा दिली असावी; शरद पवारांच्या मनात कोणती शंका?

Published:

राज्यातीलच नव्हे तर देशातील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना ही सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयावरच शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. सरकारच्या या निर्णयावर आता शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावरच शंका उपस्थित केली आहे. शरद पवार यांनी काल नवी मुंबई येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, गृह विभागाचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला तीन जणांना झेड प्लस सुरक्षा देण्याय निर्णय सरकारने घेतल्याची माहिती दिली. त्यांना मी अन्य दोन व्यक्तींची नावं विचारली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अशी (Amit Shah) नावं सांगितली. मला कशासाठी ही सुरक्षा दिली असेल याची मला माहिती नाही. पण सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फिरावं लागत आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती काढण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था केली असावी. या संदर्भात मी लवकरच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण

दरम्यान, देशातील सर्वात महत्वाच्या व्यक्ती, अधिकारी आणि नेते मंडळींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना खास पद्धतीची सुरक्षा व्यवस्था दिली जाते. या सुरक्षा व्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत. झेड प्लस सुरक्षा माजी पंतप्रधान, मंत्र्‍यांना साधारणपणे दिली जाते. एसपीजीनंतर झेड प्लस दुसरी सर्वात खास सुरक्षा व्यवस्था आहे. झेड प्लस सुरक्षा कुणाला द्यायची याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जातो. झेड सुरक्षा दोन प्रकारची असते. एक झेड प्लस आणि दुसरी झेड सुरक्षा. साधारणपणे केंद्रातील वरिष्ठ मंत्री आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा मिळालेली असते.

Sharad Pawar कशी असते झेड प्लस सुरक्षा व्यवस्था

झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही असतात. अतिशय महत्वाच्या व्यक्तींनाच ही सुरक्षा दिली जाते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात असतात आणि हे कमांडो पूर्णपणे प्रशिक्षित असतात. या सुरक्षा व्यवस्थेतील जवान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास कायम तयार असतात. या जवानांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हत्यारे असतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img