11 C
New York

Manoj Jarange  : जरांगेकडून भाजपला सुरूंग!

Published:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याने जरांगेंकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या आणि भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या रमेश पोकळेंनी जरांगेची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, भेटीदरम्यान पोकळे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच आपल्याला बीड शहरातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Manoj Jarange  भाजपमध्ये अन्याय केला जातो

वृत्तवाहिनीशी बोलताना पोकळे यांनी त्यांच्या मनातील नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले की, अनेक वर्षे काम करूनही संधी दिली जात नाही. भाजपमध्ये अन्याय केला जातो. एवढेच नव्हे तर, मराठा आरक्षणावरून भाजपमध्ये खदखद असून, इतर पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पदं दिली जातात. मात्र, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना पक्षात डावललं जात असल्याचे रमेश पोकळे म्हणाले.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे गतीमंद? आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

Manoj Jarange  तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार – जरांगे

काही दिवसांपूर्वी जालन्यात बोलताना जरांगे पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, फडणवीस तुम्ही जी फसवणूक केली त्याचा सर्वात मोठा फटका 2024 ला तुम्हांला बसणार असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे (Manoj Jarange) मी मराठ्यांचं काम करत आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर एसआयटी नेमली आणि ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला होता त्यांना तुम्ही बढत्या का दिल्या? तुम्ही कोणत्या मस्तीत आहात? असा सवाल माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी विचारला. तसेच माझ्याविरोधात दरेकर,विखे,नारायण राणे,बोंडे हे नेते बोलायला का तयार केलेत, हे नेते मराठ्यांचं काय वाईट करणार आहे असेही यावेळी जरांगे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img