17.6 C
New York

Eknath Shinde : लाडकी बहीण, भाऊनंतर आता ‘लाडका शेतकरी’ योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Published:

सर्वच राजकीय पक्ष विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. (Eknath Shinde) या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सु या लाडकी बहीण योजनेवरून रू आहेत. अशातच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली.

Eknath Shinde काय म्हणाले मुख्यमंत्री?

आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, राजकीय पक्षाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आलीयं. त्यामुळे आता या योजनेचीही राज्यभरात चांगलीच चर्चा होईल.

शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा

Eknath Shinde सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी 5 हजारांची घोषणा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. सोयाबीनला 5 हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही 5 हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय आज आपण घेत आहोत. ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img