17.6 C
New York

Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेत ‘खोडा’ घालणाऱ्यांना ‘जोडा’ दाखवा; शिंदेंची विरोधकांवर टीका

Published:

लाडकी बहीण योजनेत जे विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत त्यांना आपण जोडा दाखवण्याचं काम करा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. (Ladki Bahin Yojna) ते साताऱ्यात माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. लाडकी बहीण योजना आणली की काही लोकांनी लाडक्या भावाचं काय असा प्रश्न उपस्थित केला. यांना सहकारी सोडून गेले तेव्हा नाही आठवला भाऊ असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तसंच, आम्ही आठ हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्याचं काम भावांसाठी केलं आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणतीही टीका केली तरी आपण त्यावकडं दुर्लक्ष करून आम्हाला साथ द्यावी असंह आवाहनही मुख्यमंत्र शिंदे यांनी यावेळी केलं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नुकाताच दोन महिन्यांचा हप्ता जमा झाला आहे. मात्र, हा हप्ता जमा झाल्यानंतर काही लोकांचे तोंड पांढरे पडले अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जामंत्री म्हणून आता ज्याला पाहिजे त्याला सोलार अशी योजना सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी काम करणारं आहे असा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबईचा गड राखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन; ‘या’ 18 जणांवर मोठी जबाबदारी

आमची बहीण लाडकी आणि विरोधकांच्या मनात भरली धडकी असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कविता करत विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. लाडकी बहीण योजनेत ज्यांनी घातला खोडा, त्यांना आपण मारा जोडा. यांचा विचार खोटा, अशांच्या माथी मारा गोटा.अशी रचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावेळी लोकांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img