17.6 C
New York

Sanjay Raut : निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा CM कोण? राऊतांनी एकदाचं नाव सांगूनच टाकलं..

Published:

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) अन्य नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांतून (Congress) नाराजीचा सूर उमटला होता. याच पार्श्वभुमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचं उत्तर देऊन टाकलं आहे. पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली ते म्हणाले, चर्चेला नेहमीच वाव असतो, मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का? लाल किल्ल्यावर 10 वर्षात प्रथमच राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित होते. मोदी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात ते तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायला तयार नाहीत. आज त्यांना प्रधानमंत्री असल्यामुळे तिरंगा फडकवावा लागतो आहे. गेल्या 10 वर्षांतील सोहळा आणि आताच सोहळा पहा. 10 वर्षांपासून गुदमरलेल्या अवस्थेत सुरू आहे. जनतेची गळचेपी होती. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनता जागृत आहे. 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना जवानांचं बलिदान झालं. 10 वर्षात जवानांच बलिदान रोखू शकले नाहीत अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली.

बारामती विधानसभेला जय पवार रिंगणात? अजितदादा, म्हणाले…

Sanjay Raut भाजपाने राजकारणात दलाल निर्माण केले

पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीचं आणि जातीवादाचं राजकारण कायमचं नष्ट करण्यासाठी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले एक लाख तरुण तयार करण्याची घोषणा लाल किल्ल्यावरून केली. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 1 लाख तरुणांना पैसे देऊन भाजपच्या पगारावर कामाला ठेवणार आहेत. भाजपाने दलाल निर्माण केले आहेत. राजकारणामध्ये माणसं स्वतःहून येतात. लादले जात नाहीत. भाजपा हा तुरुंग आहे आणि त्यात डाबूंन ठेवलं जातं अशी टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut महाराष्ट्रात तीन टोळ्यांची गँग सत्तेत

महाराष्ट्रात सध्या तीन टोळ्यांची गँग आहे. अंडरवर्ल्ड एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता चालवतात. स्वतःच्या लोकांची दिवाळी करतात. धारावी पुनर्वसन प्रकल्प भूखंड दिला. अजून भूखंड धारावी प्रकल्प पुनर्वसनासाठी वाटले जातात. पण शिवसेना एकही वीट रचू देणार नाही. टोळ्यांमधील वाद सुरू आहे. मुख्य गँग आहे शिंदे फडणवीस यांच्यातील वाद पेटला आहे. हफ्तेबाजी किती झाली, कोणाच्या खिशातील पैसे नाही. मतांसाठी निर्माण केलेली ही योजना आहे. आता दोन महिन्ंयात हे सरकार पडेल आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा नव्याने योजना सुरू करू असे राऊत म्हणाले. शिवसेना भवनावर नेहमीच तिरंगा फडकवतो. त्यांची तिरंगा न फडकविण्याची मनस्थिती कधीच नव्हती. पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल यात काहीच शंका नाहा असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img