24.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘तोंड बंंद कर तुझं!’ जेवणावरुन आर्याचा डीपीसोबत झाला कल्ला

Published:

पहिल्या दिवसापासून अनेक ट्विस्ट ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाहायला मिळत आहेत. (Bigg Boss Marathi ) घरातल्या अनेक सदस्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. (Bigg Boss Marathi New Season ) तसेच बिग बॉस काही मजेदार टास्कदेखील घरातल्या सदस्यांना देत आहेत. घरात सध्या दोन गट पडले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेवणावरुन आर्या ( Aarya Jadhav) आणि डिपीमध्ये (Dhananjay Powar) कल्ला झालेला पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी आर्याला म्हणतोय, “मला असं वाटतं की तु कमी खावं”. त्यावर आर्या म्हणते, “माझ्या जेवणावर कमेंट करायची नाही… मी एकदा जेवण करेल..दोनदा जेवण करेल..तुम्ही मला सांगू नका. त्यावर धनंजय आर्याला म्हणतो,”तू तोंड बंद कर मग”. तर आर्या तोंड बंद करण्यास नका देते. यावर धनंजय तिला म्हणतो, “मग मी तुला खाताना बोलणार”. तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना आणखी कोणते नवे टास्क देणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता पाहता येईल.

Bigg Boss Marathi सूरजला समजावण्याचा DP चा तिखट कोल्हापुरी अंदाज

आजच्या भागात सूरज चव्हाणला (Suraj Chavan) समजावण्याचा धनंजय पोवारचा (Dhananjay Powar) तिखर कोल्हापुरी अंदाज पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात डीपी सूरजला समजावत म्हणतोय,”स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे. उद्या आमच्यात खेळताना समोर अरबाज, वैभव कोणीही असले तरी असं खेळू नको. सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. खेळात छान खेळलं पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे”.

Bigg Boss Marathi ‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यातनॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img