15.6 C
New York

Ajit Pawar : बारामतीत नाही तर ‘या’ मतदारसंघातून अजित दादा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Published:

मुंबई: आगमी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिले आहेत. अजितदादांनी (Ajit Pawar) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरु शकतात, अशा आशयाचे सूचक वक्तव्य केले. बारामतीत जय पवार (Jay Pawar) यांना निवडणुकीला उभे करायचे की नाही, याचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ घेईल, असे सांगत अजित पवार यांनी एकप्रकारे बारामती मतदारसंघावरील दावा सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर मग ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून तो रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी मोठा शह ठरु शकतो.

आगामी विधानसभा निवडणुकीत कारण अजित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात (Karjat Jamkhed Assembly constituency) भाजपच्या राम शिंदे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव करत रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. अजितदादा कर्जत-जामखेडमधून परंतु, यंदा रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे राहू शकते.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ajit Pawar अजित पवार बारामतीच्या जागेबाबत नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img