17.6 C
New York

Raj Thackeray : अन् आता भेदभाव केल्याचा घणाघात, राज ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका

Published:

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. याबद्दल त्यांची चाचपणीही सुरु आहे.

आता राज ठाकरेंनी युतीबद्दल एक मोठं विधान केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या अनेक प्रचारसभेतही ते दिसले. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विविध जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी महायुती सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मोठे विधान केले.

‘मविआ’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

Raj Thackeray “प्रत्येक राज्य समान असलं पाहिजे”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांकडे समान पद्धतीने पाहायला पाहिजे. ऑलिम्पिकसाठी गुजरात, देशातील सर्वात मोठे मैदान गुजरातमध्ये… हे असं कसं चालेल. जर उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि त्याने महाराष्ट्रात अशा काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला विरोध करेन. तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे. आपल्याकडे ती गोष्ट होताना दिसत नाही. त्यावर बोलायचं नाही, आक्षेप घ्यायचा नाही, असं कसं चालेल?” असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावरून आता राजकीय वर्तुळासह कार्यकर्तेही उलट-सुलट चर्चा करत आहेत.

Raj Thackeray “महायुती सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मोठं विधान”

“मी त्यावेळी सांगितलं होतं की, ही युती लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. मी त्यात विधानसभेबद्दल काहीही बोललो नाही. 1984 साली राजीव गांधींना बहुमत मिळालं होतं. त्यानंतर 30 वर्षांनी नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं. आपण निवडणुकीच्या आधी काय बोलतो आणि निवडून आल्यानंतर काय करतोय याचं जर भान सुटलं तर हे असं होतं”, असे राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img