16.4 C
New York

Sanjay Raut : फडणवीस-राज ठाकरे भेटीवर काय म्हणाले संजय राऊत

Published:

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी (21 ऑगस्ट) झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरत आहे. अशामध्ये बेस्ट पतपेढी निवडणुकीत मनसेने युती केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना दोघांच्या भेटीबद्दल विचारले असता, ‘आम्हाला माहिती आहे त्यांनी का भेट घेतली, कशाला सांगू?’ असे म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता बेस्ट निकालानंतर झालेली राज ठाकरे आणि फडणवीस भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

“घरोघरी गणपती येत असतात, कदाचित ते गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील. किंवा राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. ज्या पद्धतीने फडणवीस यांच्या काळात मुंबई, ठाणे, नशिकसारखी शहरे दोन दिवसाच्या पावसात बुडाली. त्यासंदर्भातील काही प्रश्न विचारण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले असतील. त्यामध्ये एवढे त्रास करून घायची गरज नाही. आम्हालाही त्रास झालेला नाही. आम्हाला माहिती आहे, काय आहे ते.” असे संजय राऊत यांनी म्हणताच, नेमकं काय आहे? असा प्रश्न त्यांना पत्रकाराकडून विचारण्यात आला. यावर त्यांनी, ‘कशाला सांगू?’ एवढेच उत्तर दिले. तसेच, ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षातील नेते भेटत असतात. दिल्लीत आम्हीसुद्धा अनेकदा भेटतो. यावर कशाला चर्चा करायची? याआधीदेखील ते अनेकदा भेटले आहेत. भेटू द्यात,” असे म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut बेस्ट निवडणूक हा दिल्लीचा विषय नाही

बेस्ट निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उबाठाने युती केली होती. मात्र यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याबाबत शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, “बेस्ट पतपेढीची निवडणूक आहे. का एवढ गांभीर्याने घेत आहात? ती महाराष्ट्राची, लोकसभेची, महापालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपेढीत कोण मतदार आहेत? तेही माहिती नाही.” असे म्हणत बेस्ट पतपेढीच्या निकालावर भाष्य केले आहे. “पतपेढीमध्ये काही लोकं एकत्र आले, लढले असतील. हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही. ही एका बेस्टच्या बस आगरामधील एक चर्चा आहे. तुम्ही त्याला इतके भव्य स्वरूप देत आहेत. मी अशा विषयांवर चर्चा करत नाही, त्यासाठी आमचे वेगळे लोकं आहेत.” असे ते पुढे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img