24.6 C
New York

Narendra Modi : देशातील युवकांसाठी PM मोदींची मोठी घोषणा

Published:

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे. त्यांनी पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू केली जात आहे. आज म्हणजेच 15 ऑगस्टपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत योजना लागू झाली आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.केंद्र सरकारने आधी ही योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव्ह (ELI) या नावाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर तिला विकासित भारत रोजगार योजना असे नाव देण्यात आले. या योजनेचा उद्देश तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीत आर्थिक मदत देणे आणि मालकांना नवीन रोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मोठ्या घोषणा केल्या. जीएसटीच्या आढाव्यासह त्यांनी आज पीएम विकसित भारत योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पहिली नोकरी मिळाल्यानंतर युवकांना 15 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. आजपासूनच ही योजना देशभरात लागू झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या योजनेसाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळाल्यानंतर संबंधित युवक आणि युवतींना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत आगामी दोन वर्षांत साडेतीन कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Narendra Modi योजनेतील अटी जाणून घ्या

या योजनेत सरकारने उत्पादन क्षेत्रावर फोकस केला आहे. याचाच विचार करून योजना तयार करण्यात आली आहे. एखाद्या युवकाने पहिल्यांदाच एखाद्या कंपनीत जॉब सुरू केला त्यावेळी त्याला सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. या योजनेत काही अटी देखील आहेत. या अंतर्गत नोकरी मिळवणाऱ्या युवकाला त्या कंपनीत कमीत कमी सहा महिने काम करावे लागेल. यासह संबंधित कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण केल्या जात असतील तरच अनुदान मिळेल.

Narendra Modi अर्ज कसा कराल

या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या कंपनीत रुजू होताल त्यावेळी पीएफ अकाउंट (PF Account) उघडले जाईल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र होताल. या योजनेतील पहिला हप्ता सहा महिन्यांनंतर थेट खात्यात जमा करण्यात येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img