लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly elections)(Vote Chori) झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. भाजप (BJP) हा निवडणूक आयोगाला (Election Commission) हाताशी धरून मतचोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आता भाजपने काँग्रेसवर (Congress) हल्ला चढवला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे (Sonia Gandhi) नाव ४५ वर्षांपूर्वी, भारतीय नागरिक होण्यापूर्वीच, बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय (Amit Malviya) यांनी केला.
तर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दावा केलाय की सोनिया गांधी यांचा जन्म १९४६ मध्ये इटलीमध्ये झाला होता. त्यांचं नाव १९८० ते १९८२ पर्यंत मतदार यादीत होते. भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या एक वर्ष आधीच त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवलं होतं.
त्यानंतर अमित मालवीय यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यांनी त्यांनी म्हटलं की, सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. दोन्ही वेळा त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हते, असं ते म्हणाले. यासोबत त्यांनी थेट एक पुरावाचा ट्वीटमध्ये जोडला आहे. त्यांनी म्हटलं की, हे संपूर्ण प्रकरण निवडणूक कायद्याच्या स्पष्ट उल्लंघनाचे उदाहरण आहे आणि कदाचित म्हणूनच राहुल गांधी देखील अपात्र किंवा बेकायदेशीर मतदारांना कायदेशीर करण्याच्या बाजूने आहेत आणि विशेष सघन सुधारणेला ला विरोध करत आहेत, असं मालवीय यांनी म्हटलं.
मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा १९८० मध्ये मतदार यादीत नोंदवले गेले होते. त्यावेळी त्या इटालियन नागरिक होत्या आणि त्यांनी अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नव्हते. त्यांनी कायद्याचं स्पष्ट उल्लंघन केलं आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. मालवीय यांच्या दाव्यानुसार, सोनिया गांधींनी १९६८ मध्ये राजीव गांधींशी लग्न केलं. त्यावेळी गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अधिकृत निवासस्थान १, सफदरजंग रोड येथे राहत होते.
मालवीय पुढे म्हणाले, त्यावेळी या पत्त्यावर इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मनेका गांधी यांची नावे मतदार म्हणून नोंदवण्यात आली होती, परंतु १९८० मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाची मतदार यादी सुधारित करण्यात आली, तेव्हा इंदिरा गांधींचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं. त्या इटलीच्या नागरिक होत्या. त्यानंतर बराच वाद झाला आणि त्यांचं नाव १९८२ मध्ये मतदार यादीतून काढण्यात आलं.