32.2 C
New York

Sanjay Raut : ”रखवालदार चोर बनला आहे” संजय राऊतांचा हल्लाबोल

Published:

दिल्लीच्या (Delhi) रस्त्यावर लोकशाहीच्या रक्षणासाठी 300 हून अधिक खासदार उतरले असताना, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र हल्लाबोल केला. राऊतांनी संसदेची तुलना लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराशी करताना, त्याच मंदिरात चोरी व कारस्थान करणारे लोक सत्तेत बसले असल्याचा आरोप केला.

निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा हस्तक बनला असून, विरोधकांना संपविण्याचे कारस्थान सुरु असल्याचे ते म्हणाले. “रखवालदार चोर बनला आहे” अशा शब्दांत त्यांनी आयोगावर टीका केली. तसेच, आयोगाने दिवंगत मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करून आदर्श आचारसंहिता राबवावी, अशीही मागणी केली.

राऊतांनी सरकारवरही थेट निशाणा साधत म्हटलं की, “मोदी (Modi), शहा (Shah) आणि फडणवीस (Fadnavis) हे सरळमार्गाने नव्हे, तर लांड्यालबाड्या करून सत्तेवर आले आहेत.” त्यांनी आणखी आरोप केला की, खासदारांना दिल्ली पोलिसांनी अडवून, डिटेन करून संसदेत पोहोचू दिले नाही, आणि त्याच काळात सरकारने सर्व बिलं मंजूर करून घेतली. “लोकशाही टिकली तरच देश टिकेल” असा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img