15.9 C
New York

Sanjay Raut : मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र! राऊतांचं सूचक विधान, मविआची समीकरणं बदलणार?

Published:

ठाकरे बंधूंची युती कधी होणार, ते कधी येणार, असे प्रश्न राजकीय वर्तुळात होते. अखेर त्यांना आता पुर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकांमध्येमुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं, राऊतांनी सूचक विधान केलंय. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मविआची समीकरणं बदलणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय, आपण ते पाहू या.

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. काही एकत्र भूमिका घेण्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) ठरवलं असेल, तर पूर्ण देशातील मराठी प्रेमी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल. राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या विरूद्ध कोणतीही भूमिका घेतलेली नाही. कधी काळी शिवसेनेवर आरोप होत होते. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलं पाहिजे, एक आंदोलन अशा प्रकारचं बंगालमध्ये सुरू आहे, अशी भूमिका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली आहे.

Sanjay Raut स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…

ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलं आहे. दक्षिण भारतात देखील हीच परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत म्हटलंय की, कोणताही निर्णय घेण्यासाठी दोन्ही बंधू सक्षम आहेत. राऊत यावर म्हणाले (Maharashtra Politics) की, आम्ही सगळ्यांशी चर्चा करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून अशी कोणतीही आघाडी तयार झालेली नाही.

Sanjay Raut ठाकरे बंधू एकत्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार, त्या-त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना असतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईसंदर्भात स्वतंत्र भूमिका घेण्यासाठी समर्थ आहेत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट (BMC Election) केलंय. ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. त्याचे संकेत आता राऊतांनी दिले आहेत. इंडिया आघाडीत सुद्धा ठाकरे बंधू एकत्रित आल्यास कोणालाही काही समस्या नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

Sanjay Raut मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची

मुंबईसाठी ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात. इंडिया आघाडीत त्यासंदर्भात कोणालाही आक्षेप नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. इतर कोणतीही आघाडी यासाठी झालेली नाही, असं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार नसल्याचं आता दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img