15.8 C
New York

PM Kisan Yojana : गुडन्यूज! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये

Published:

शेती करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, त्यांच्या वाराणसी येथील संसदीय मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 20 वा हप्ता जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत, सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देशभरातील थेट 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.

PM Kisan Yojana पैसे नेमके कधी येणार?

पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता वाराणसीत सुरू होणार आहे. याच कार्यक्रमात ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करतील. पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे वितरण त्याच वेळी करतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे ट्रान्सफर होणार आहेत.

PM Kisan Yojana 20 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

– या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल,
– ज्यांची माहिती अधिकृत पीएम किसान पोर्टलवर योग्य व अपडेटेड आहे,
– ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे,
– ज्यांचे बँक तपशील आणि आधार क्रमांक लिंक आहेत,
– ज्यांची जमीन संबंधित कागदपत्रांसह पडताळलेली आहे.

PM Kisan Yojana तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? अशा प्रकारे तपासा :

– अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in
– या विभागात ‘लाभार्थी स्थिती (Beneficiary Status)’ वर ‘Farmer Corner’ क्लिक करा.
– तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
– आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.

PM Kisan Yojana पीएम किसान योजनेसाठी पात्रता काय?

– सरकारने या योजनेसाठी काही अटी निश्चित केल्या आहेत:
– शेतकऱ्यांकडे वैध आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
– आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक.
– ई-केवायसी पूर्ण केलेली असावी.
– जमिनीची कागदपत्रे व पडताळणी पूर्ण असावी.

2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, आत्तापर्यंत 19 हप्त्यांमध्ये सुमारे 3.69 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img