22.7 C
New York

Donald Trump : अमेरिकेने भारताला डिवचले! पाकिस्तानसोबत तेल कराराची हातमिळवणी

Published:

बुधवारी एक खळबळजनक दावाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) केलाय. तसंच पाकिस्तानसोबत (Pakistan) तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. भारतालाही (America Oil deal with Pakistan)पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत तेल विकू शकेल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

ही घोषणा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर केली. विशेष म्हणजे, 1 ऑगस्टपासून ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली. नवा पाकिस्तानसंबंधी निर्णय त्यानंतर काही तासांतच हा जाहीर केला (Shocking News) आहे. आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक नवीन करार केला आहे. त्याअंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका मिळून त्यांच्या तेल साठ्यांचा विकास करतील. सध्या आम्ही या उपक्रमाचं नेतृत्व करणाऱ्या तेल कंपनीची निवड करण्याच्या प्रक्रियेत आहोत. भारतालाही (India) कोणाला ठाऊक, कदाचित हे तेल विकलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांनी असं देखील म्हटलंय.

Donald Trump भारतावर कर, पाकिस्तानसोबत करार

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पाकिस्तानसंबंधी निर्णय भारतासाठी महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे. भारताकडून होणाऱ्या आयातींवरकारण याच आठवड्यात त्यांनी 25 टक्के कर आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी रशियाकडून भारत करत असलेल्या तेल खरेदीचा आणि अमेरिकेची व्यापारतूट वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की, ते अनेक देशांच्या नेत्यांशी व्यापार करारांबाबत चर्चा करत आहेत.

Donald Trump पाक-अमेरिका वाटाघाटी पूर्वीपासून

या घोषणा अचानक झाल्या असल्या तरी या कराराच्या हालचाली मागील काही महिन्यांपासून सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबियो यांची भेट घेतली होती. त्या बैठकीतच अमेरिका आणि पाकिस्तानमधील संभाव्य व्यापार करार पूर्णत्वाकडे जात असल्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. सध्या या कराराबाबत अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित तेल कंपन्यांची नावं, कराराची अंतिम मुदत किंवा आर्थिक स्वरूप याविषयी कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img