21.5 C
New York

PM Modi : “मोदी म्हणजे विष्णूंचा अवतार? राज पुरोहितांचा वादग्रस्त दावा,

Published:

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अहवालात त्यांना जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये अग्रस्थानी मानण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांनी एक खळबळजनक विधान करत मोदींची थेट देवाशी तुलना केली आहे.

पुरोहित यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूंचे ११वे अवतार आहेत.” हिंदू धर्मशास्त्रांनुसार विष्णूंचे दहा अवतार – मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि भविष्यातील कल्की – यांची स्पष्ट माहिती दिलेली आहे. मात्र, पुरोहित यांनी या यादीत ११व्या अवताराची भर घालत थेट मोदींचा उल्लेख केला आहे.

पुरोहित यांनी मोदींच्या कार्यक्षमतेचे भरभरून कौतुक करताना त्यांना थेट “दैवी अवतार” ठरवलं. “ते इतके ऊर्जा-समृद्ध आहेत की, देश-विदेशात सतत दौरे करूनही थकत नाहीत,” असे म्हणत त्यांनी मोदींच्या पोर्तुगाल, अमेरिका, फिनलँड, लंडन आणि अहमदाबाद दौऱ्यांचा उल्लेख केला.

याच भाषणात पुरोहित यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला – “डोनाल्ड ट्रम्प गेल्या तीन महिन्यांपासून मोदींना फोन करत आहेत, पण मोदींनी अजून एकदाही त्यांचा फोन उचललेला नाही.” तसेच, भारत-पाक संघर्ष शांत करण्याचे श्रेय ट्रम्प यांनी घेतले असले, तरी भारत व पाकिस्तानने त्यांचा मध्यस्थीचा दावा फेटाळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img