27.7 C
New York

Sanjay raut : ‘हे’ सरकार कॅरेक्टर लेस सरकार आहे. संजय राऊतांचा घणाघात

Published:

झारखंडमधील पथकानेठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मद्य घोटाळ्या प्रकरणी अमित साळुंखे याला अटक केली. हा अटक केलेला इसम शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्ती असून तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

Sanjay raut संजय राऊत काय म्हणाले?

सुमित फॅसिलिटी हा अमित साळुंखेचा विषय मी वारंवार सांगतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलत आहे ते गांभीर्याने घ्या. नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि तुमच्या एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील. इतकं गंभीर हे प्रकरण आहे, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी सरकारला दिला. सुमित फॅसिलिटी हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ही कंपनी कोणाची आहे? तर श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन म्हणजेच उपमुख्यमंत्री यांचे बाळराजे. त्यांचे मेडिकल फाउंडेशन चालते. फार मोठी सामाजिक सेवा करत आहेत. या मेडिकल फाउंडेशनमधला पैसा हा भ्रष्ट मार्गाने आलेला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.शिंदे पिता-पुत्राने कारण अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट गैरमार्गाने देण्याचे केले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत , त्या व्यक्तीला मद्यघोटाळा समोर आला, अटक केली. त्यानंतर ८०० कोटीच्या ॲम्बुलन्स टेंडरमध्ये फार मोठा प्रमाणात घोटाळा झाला. कल्याण-डोंबिवली येथील घनकचरा व्यवस्थापनाचे साडेआठशे कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट नियमबाह्य पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाने सुमित फॅसिलिटीला दिले. इतके धडाधड कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारे मिळत गेले, याचे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मद्यघोटाळ्यातला पैसा, टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे, असा आरोपच संजय राऊत यांनी शिंदेंवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना याचे गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत हे विसरून जायला पाहिजे. हजारो कोटीचे घोटाळे सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पिता-पुत्राने केले आहेत. त्यामुळे त्यांची सध्या पळापळ सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT स्थापन करायला पाहिजे. त्यांना एसटी स्थापन करण्याचा छंद आहे. त्याचे पुढे काय होते आम्हाला माहित नाही? पण इथे त्यांनी एसआयटी स्थापन करावी आणि त्याला कालमर्यादा द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना केली आहे.

२५ जुलै रोजी संजय राऊत यांच्या सामना मधून राज्यातील वादग्रस्त मंत्र्यांच्या फेरबदलाची शक्यता वर्तवली गेली होती आणि त्यामुळे राजकीय चर्चांना चांगलाच उधाण आलं. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता,

याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे कॅरेक्टर लेस सरकार आहे. चारित्र्यहीन सरकार आहे. याला जबाबदार स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचा मधल्या काळात वाढदिवस झाला, त्यांच्या गुणांचा गौरव करणारी स्मरणिका आली. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर फुले उधळली. त्या फुलांचा वास सुकला नसेल तर त्यांनी आपण चारित्र्यवान आहोत आणि मी चारित्र्यवान सरकार चालवत आहे, यासाठी त्यांना काम करावे लागेल. त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री डान्सबार चालवतो. स्वतः गृहराज्यमंत्री डान्सबार चालवत आहेत. एक मंत्री सिगारेटचा धूर सोडत उघडा बसला आहे आणि पैशाच्या उघड्या बॅग्स कपाटात भरलेल्या आहेत. तो दाखवत आहे की, आम्ही किती पैसेवाले आहोत, लुटमार करणारे आहोत. टॉवेलवरएक मंत्री मारीमारी करतो, एक मंत्री रमी खेळत आहे. हे तुमच्या मंत्रिमंडळाचं कॅरेक्टर आहे. ही नैतिकता आहे. यावर जरा अभ्यास करा. तुमच्यावर जी स्मरणिका आहे, त्यातील लेख परत वाचा. जी फुले उधळली आहेत, ती प्लास्टिकची आहेत ही खरी आहेत ते बघा. हे समजून घ्या आणि राज्य चालवा, असा टोला त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

तर पुढे बोलताना, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ७५ टक्के मंत्री युजलेस आहेत. मंत्री म्हणून ते काम करत नसून दरोडेखोर म्हणूनच ते काम करत आहेत. त्यांना मंत्रीपदाचे आणि आपल्या कामाचे भान नाही. लुटमार करण्यासाठी त्यांना शपथा दिल्या आहेत. या मंत्र्यांचा काय रिपोर्ट गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे आहे? विरोधी पक्ष सांगतोय तेव्हा ते दुर्लक्ष करतात. कारण त्यांची मजबुरी आहे. ते कुणाला घाबरत आहेत का? शिंदे आणि पवारांकडे त्यांची काही सिक्रेट आहेत का? आम्हाला कळलं पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img