25.2 C
New York

PM Modi : PM मोदींची ऐतिहासिक झेप! इंदिरा गांधींचा विक्रम पार केला

Published:

एक नवा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नावावर अजून नोंदवला जात आहे. आज 25 जुलै 2025 रोजी मोदी एक ऐतिहासिक टप्पा गाठत आहेत. सलग दोन कार्यकाळांत भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 4,078 दिवस पूर्ण करत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा सलग कार्यकाळ मोडीत काढला आहे. त्यामुळे आता मोदी हे देशाचे सलग (India PM) सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

PM Modi नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पदावर

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत, म्हणजेच तब्बल 16 वर्षे आणि 286 दिवस पंतप्रधानपद सांभाळलं. त्या तुलनेत मोदी यांनी आजपर्यंत सलग 4,078 दिवस देशाचं नेतृत्व केलं आहे. 24 जानेवारी 1966 पासून 24 मार्च 1977 पर्यंतइंदिरा गांधी यांचा सलग कार्यकाळ \ 4,077 दिवसांचा होता, जो मोदींनी आता एका दिवसाने मागे टाकला आहे.

PM Modi सर्वात जास्त सत्तेवर राहिलेले पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. ते काँग्रेसच्या बाहेरील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देत त्यांनी सलग तीन वेळा सत्तेत येण्याचा विक्रम केला.

PM Modi सहा निवडणुकीत सलग विजय मिळवणारे नेते

पीटीआयच्या वृत्तानुसार, मोदी हे देशातील असे एकमेव नेते आहेत ज्यांनी सलग सहा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे.
गुजरात विधानसभेच्या निवडणुका: 2002, 2007, 2012
लोकसभा निवडणुका: 2014, 2019, 2024

PM Modi गुजरातचे दीर्घकाळ मुख्यमंत्री

पंतप्रधान होण्याआधी मोदी हे गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. तब्बल 13 वर्षे त्यांनी 2001 ते 2014 या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी भाजपला सलग तीन वेळा विजय मिळवून दिला होता. तर इंदिरा गांधी यांनी आपला दुसरा कार्यकाळ 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 या कालावधीत पूर्ण केला होता. त्यांच्या कार्यकाळातच त्यांची हत्या झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img