दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर आज 21 जुलै 2025 पासून सुरूवात होत आहे. त्याअगोदर पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांनी देशवासियांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी फडकावलेल्या तिरंग्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
Pm Modi काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, पावसाळा नाविन्य आणि सर्जनशीलतेच प्रतिक आहे. हा काळ देशाला नवी उर्जा, प्रेरणा आणि नव्या धोरणांना जन्म देणारा आहे. सध्या देशात अनुकूल पाऊस होत आहे. जो कृषी आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. पाऊस हा शेतकरी, गावं, आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या 10 वर्षांतील तिप्पट जास्त पाणीसाठी या पावसाळ्यात निर्माण झाला आहे. ज्याचा येणाऱअया काळात अर्थव्यवस्थेला जास्त फायदा होणार आहे.
Pm Modi तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या दारात
पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचाही यावेळी उल्लेख केला. पूर्वी आपण जगात दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो. आता जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आपण आहोत. जगातील प्रत्येक मंचावर भारत विकासाची दस्तक देत आहे, असंही ते म्हणाले.
Pm Modi विरोधकांची सरकारला घेरण्याची तयारी
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची विरोधकांनी तयारी केली आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतरच ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला मध्यस्थीचा दावा आदी मुद्दे विरोधकांकडून उचलण्यात येणार आहेत. यावेळी मोदींनी सभागृहात उपस्थित राहावं, अशी विरोधकांची मागणी आहे. त्यामुळे मोदी सभागृहात उपस्थित राहून विरोधकांचं म्हणणं ऐकणार का? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. म्हणजे 21 बैठका होणार आहेत.