28.4 C
New York

Eknath Shinde : गिरणी कामगारांना मुंबईत घरे, डबेवाल्यांसाठीही निवासाची तरतूद ; एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

Published:

मुंबईतील (Mumbai) गिरणी कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारच्या नव्या गृहनिर्माण धोरणात (Houses For Mill Workers) मुंबईतील गिरणी कामगारांना घरे दिली जाणार असून, शहराच्या महत्त्वाच्या सामाजिक घटकांपैकी एक असलेल्या डबेवाल्यांच्या (Dabbawalas) निवासाचीही सोय करण्यात येणार आहे. गृहनिर्माण आणि नगरविकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

Eknath Shinde डबेवाल्यांना घरं मिळणार

एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, गिरणी कामगार हे मुंबईच्या औद्योगिक वारशाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांना सन्मानपूर्वक आणि शाश्वत निवास मिळावा ही आमची जबाबदारी आहे. तसेच अनेक दशकं (Maharashtra Politics) मुंबईच्या डबेवाल्यांनी शाळा-ऑफिस-घर यंत्रणा या शहराची सांभाळली आहे. त्यामुळे त्यांच्या निवासाचाही विचार गृहनिर्माण धोरणात केला जाणार आहे.गिरणी कामगारांच्या संदर्भात बैठक झाली आहे. हा विषय देखील महत्वाचा आहे. महायुती सरकारच्या काळात तेरा हजार घरं देण्यात येणार आहे. मुंबईलगत त्यांना एसआरए प्रकल्पांतर्गत घरं देणार येत आहेत. आतापर्यंत गिरणी कामगारासंदर्भात आंदोलन झाली, परंतु आम्ही त्यांना घराची चावी दिली, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. गिरणी कामगारांना देखील हे सरकार घरं दिल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

Eknath Shinde रखडलेले प्रकल्प मार्गी

1.74 लाख गिरणी कामगारांची नोंद मुंबईत काम केलेल्या पूर्ण झाली आहे. तर 13,161 कामगारांना आतापर्यंत घरं वाटप करण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे यांनी अजून 1 लाख घरे उभारण्याचे लक्ष्य असल्याचं स्पष्ट केलंय. तर नवे प्रकल्प 7 जागांवर सुरू आहेत. 40 लाख झोपडपट्टीवासीयांचे रखडलेल्या योजना सरकारी संस्थांमार्फत पूर्ण करून पुनर्वसन करण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलंय. तर पुनर्विकास प्रकल्प गतीत असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. वरळी, वांद्रे, गोरेगाव, कामाठीपुरा अशा भागांतील रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. 556 घरांचे वाटप वरळीमध्ये 15 ऑगस्टपूर्वी करण्यात आलंय. हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य आहे, असं एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बोलताना म्हटलंय.

Eknath Shinde अधिवेशनाचा चौथा दिवस

आठवड्याचा आज चौथा दिवस आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच एकाच मंचावर पाहायला मिळाले. महायुती सरकारला सत्तेत येऊन आठ महिने झाले तरीही सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच विधिमंडळ पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काहीच मिळाले नसल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत याविरोधात आंदोलन केलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img