आम्ही २०२९ पर्यंत विरोधकांच्या बाजूला येण्याचा काही स्कोप नाही. मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार येईल, अशी खुली ऑफरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. ही ऑफर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच दिल्याने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मुंबईतील रेस्टॉरंट
देवेंद्र फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत आहे. याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सध्या फडणवीस यांचा कारभाव डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन चालला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
Sanjay Raut डुप्लिकेट लोकांना वैचारिक किंवा नैतिक आधार नाही
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत आहे. याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात चिन्ह आणि नावाबद्दल लढा देत आहे. आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, ही आम्हाला खात्री आहे. फडणवीस यांच्यासोबत जे डुप्लिकेट लोक बसली आहेत, त्यांचा विचार फडणवीस यांनी करावा. सध्या फडणवीस यांचा कारभाव डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन चालला आहे. फडणवीस यांची ऑफर नाही, ह्या टपल्या आणि टिचक्या आहेत. डुप्लिकेट लोकांना वैचारिक किंवा नैतिक आधार नाही. असे असताना फडणवीस हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑपर देत आहेत. ती वैचारिक दिवाळखोरी आहे.”
Sanjay Raut राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असते
“राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असते. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन युद्ध थांबवतील वाटलं होतं का? लाहोर, कराची, इस्लामाबादवर तिरंगा फडकवून मोदी शांत बसतील, असं वाटलं होतं. आता काय झालं? हे पाहतोय,” राऊत यांनी असा टोलाही लगावला आहे.
Sanjay Raut इंडिया आघाडीतील अनेक पक्ष अस्वस्थ
“उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी फोनवरून संपर्क साधला. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. इंडिया आघाडीतील अनेक पक्ष अस्वस्थ आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबद्दल दिशा ठरवण्याची गरज आहे. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल हाचलाच सुरू आहे. सध्या १९ तारीख ठरवली आहे. पण, ही तारीख कितीजणांना सोयीची आहे, हे पाहावे लागेल. इंडिया आघाडीची बैठक नक्कीच होणार आहे. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांचा दौरा जाहीर करू. संसदेच आंदोलन, राष्ट्रीय प्रश्न याविषयावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. राऊत यांनी येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल चर्चा करणे मुर्खपणाचे आहे,” असे सांगितलं.