राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी लक्षवेधीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल. असंही ते म्हणाले. मात्र यावेळी सकाळी दहाचा भोंगा असं म्हणत सभागृहामध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीपण्णी केली गेली. त्यावर आता संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
Sanjay Raut काय म्हणाले संजय राऊत?
जर ध्वनिप्रदुषण म्हणून भोंग्यांवर कारवाई होणार असेल तर उद्या माध्यमांवर देखील बंधनं येतील. जन सुरक्षा कायद्याव्दारे ती आणली जातील. हा कायदा त्यासाठी आणला आहे. जेणे करून पत्रकार विरोधक आणि विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं लोकांपर्यंत पोहचवू शकणार नाहीत. पण मला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तर तुम्ही मला पत्रकार म्हणून प्रश्न विचारत आहेत. त्यावर मी परखडपणे उत्तर देतो. त्यामुळे सरकारचं वस्त्रहरण होत आहे. त्याची फडणवीस आणि सरकारमधील गद्दार आमदारांना वाटणार. त्यामुळे जर माझा आवाज त्यांना टोचत असेल तर जनतेचा आवाज बुलंद आहे असं मला वाटतं. असं म्हणत राऊतांनी लागवाला आहे.
Sanjay Raut सभागृहात नेमकं काय झालं?
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी लक्षवेधीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल. असंही ते म्हणाले. यावेळी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी फडणवीसांना सांगितलं की, तु्म्ही सगळ्या कारवाया योग्य करता पण त्या सकाळी दहाच्या भोंग्याचंही काही तरी करा. त्यावर फडणवीस म्हणाले त्यावर अजून तरी फक्त ध्वनिप्रदुषणांतर्गत कारवाई करता येते. कारण अजूनही आपल्याकडे विचारांच्या स्वातंत्र्यावर बंदी नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लागवण्यात आला.