अमेरिकेला (Russia Sanctions Bill) भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री खुपू लागली आहे. अमेरिकेतील दोन मोठे नेते लिंडसे ग्राहम (रिपब्लिकन) आणि रिचर्ड ब्लूमेंथल (डेमोक्रॅट) यांनी एकत्रितपणे एक बिल सादर केले आहे. रशियाकडून तेल (India Russia) आणि युरेनियमची खरेदी करणाऱ्या देशांवर जास्त टॅक्स आकारावा अशी मागणी करण्यात आली आहे. यात विशेष करुन भारत आणि चीन यांचा (China News) समावेश आहे. दोन्ही देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. सेंक्शनिंग रशिया अॅक्ट ऑफ 2025 या विधेयकाचं नाव असे आहे.
India रशियाचं तेल खरेदी करणाऱ्या देशांना शिक्षा
या विधेयकानुसार जर एखादा देश रशियाकडून तेल, गॅस आणि युरेनियम खरेदी करत असेल तर त्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 500 टक्के टॅक्स आकारला जाईल. रिचर्ड ब्लूमेंथल यांनी सांगितले की जगाने ऊर्जेसाठी रशियावर अवलंबून राहू नये आणि युक्रेन युद्धाच्या बाबतीत रशियाला शिक्षा देता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
India ..तर भारताला मोठा फटका
जर विधेयक मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली तर याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. या विधेयकाला अमेरिकेतील दोन्ही पक्षांतील एकूण 80 खासदारांचा पाठिंबा आहे. रशियाचा युद्ध निधी कमी करण्यासाठी हे विधेयक आवश्यक आहे असे अमेरिकेचे म्हणणे आहे. रिचर्ड ब्लूमेंथल यांनी या आठवड्यात रोममध्ये युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. अमेरिका तुमच्या पाठीशी राहिल असे आश्वासव त्यांनी दिले होते.
सामान्य आर्थिक निर्बंधांच्या तुलनेत हे बिल वेगळे आहे. या विधेयकामुळे फक्त रशियन कंपन्या किंवा बँका यांनाच फटका बसणार नाही तर जे देश रशियाकडून तेल खरेदी करत आहेत त्यांनाही फटका बसणार आहे. भारताने मागील वर्षात एकूण आयातीच्या 35 टक्के तेल रशियाकडून खरेदी केले होते. जर या विधेयकानुसार 500 टक्के टॅरिफ लागू झाला तर भारत, चीन, तु्र्की, आफ्रिका या देशांची उत्पादने अमेरिकेत जाणे बंद होईल.