राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. (Heavy rain)बुधवारी रात्रीपासून मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. या पावसाचा जोर गुरुवारी असणार आहे. पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागांत हजेरी लावणार आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भात अजूनही पाऊस सक्रीय झाला नाही. हवामान विभागाने परंतु ६ जुलैपासून या भागांत पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.
Heavy rain ६ जुलैनंतर पाऊस सक्रीय
महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस ६ जुलैपासून चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. ३ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
Heavy rain पुण्यात रात्रभर पाऊस
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु बुधवारी रात्री चांगला पाऊस झाला. रात्री पुणे शहरांसह घटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली. घटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. 6451 क्यूसेक्स विसर्ग रात्री 12 पासून करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
Heavy rain पुणेकरांनो पाणी उकळून प्या
नागरिकांकडून धरणाच्या पाण्यात गढूळपणा वाढल्याने खराब पाणी येत असलेल्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. महापालिका पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक काळजी घेत असून पाणी उकळून नागरिकांनीही आणि गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नाशिक जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा संततदार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला आहे. 2133 क्यूसेस पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याला पवना धरण क्षेत्रात पावसाळ्याची चांगली सुरुवात झाली आहे.