पंढरपूरसाठी 23 एसटी गाड्या आरक्षित, उद्या होणार रवाना
लाखो वारकरी भाविक आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अनेक भाविक, वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जातात. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी विभागानेही गाड्यांचे नियोजन केले आहे. आत्तापर्यंत 23 एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. 3 जूनला रत्नागिरी सह विविध आघातून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहेत. अजून काही दिवस असल्याने भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने केले आहे.
अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान
– मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान
– तर बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात
– उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हवालदिल
– कांद्याला ५०० रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
– चालू पावसाळी अधिवेशनात कांद्याला ५०० रुपये अनुदान जाहीर करण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाची सुरूवात
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून शहरात मात्र पावसाची उघड झाप आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी आठवड्यात दुसऱ्यांदा पात्र बाहेर पडले आहे. पंचगंगा नदी क्षेत्रात असणाऱ्या 33 बंधाऱ्यांवर पाणी असल्यामुळे इथली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची संततधार असल्यामुळे धरण क्षेत्रात देखील वाढ होताना दिसत आहे. राधानगरी धरण सध्या 66 टक्के भरले आहे.
विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार कमी , साधारण पाऊस होईल
– मात्र 6 जुलै नंतर पावसाचा जोर वाढणार आणि चांगल्या आणि वादळी पावसाला होणार सुरवात
– जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज
– 6 जुलै च्या आसपास बंगाल च्या खाडीत एक सिस्टम बनण्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव विदर्भावर होऊन चांगला पाऊस होणार …