26.2 C
New York

Bachchu Kadu : न्यायालयाकडून बच्चू कडू यांना मोठा दिलासा; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर कायम

Published:

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष अपात्र प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू हे अध्यक्षपदावर पदावर कायम राहतील, असा निर्णय नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे. दुसऱ्याच दिवशी कडूंना आंदोलन स्थगितीच्या मोठा धक्का मिळाल्याची जिल्हाभरात चर्चा रंगली होती.

सूड बुद्धीने कारवाई केल्याचा कडूंचा आरोप – विभागीय सहनिबंधक यांनी सर्व गोष्टी धाब्यावर बसवून, सूड बुध्दीने कारवाई करत आपल्याला अध्यक्ष पदावरुन अपात्र केले. परंतु अखेर सत्याचा विजय झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कडूंना एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाली होती. काही बँकेच्या संचालकांनी त्याचा आधार घेत त्यांना अपात्र करण्यात यावे, सहकार विभागाकडं अशी मागणी केली होती.

दिलेला निर्णय सत्तेचं दबावतंत्र म्हणून सूड भावनेनं … दिव्यांग बांधवांच्या शेतकरी मजूर आशीर्वादानं,आमच्यासोबत न्यायदेवतेनं न्याय केला. त्यांना मानाचा मुजरा आम्ही करतो…. आम्ही सत्याची बाजू जिंकलेली आहे… सत्ता हरलेली आहे. – बच्चू कडू, चेअरमन अमरावती जिल्हा सहकारी बँक

Bachchu Kadu प्रकरण पोहोचले होते न्यायालयात

बच्चू कडू यांनी या कारवाईच्या विरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणी आज न्यायालयाने निर्णय देत कडू यांना जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

Bachchu Kadu असे होते संपूर्ण प्रकरण

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमांनुसार, जर एक वर्षापर्यंतची शिक्षा बँकेच्या संचालकाला न्यायालयानं सुनावली असेल, कोणत्याही पदावर तर तो संचालक बँकेच्या राहण्यास अपात्र ठरतो. बँकेच्या विरोधी गटातील 12 संचालकांनी याच नियमाचा आधार घेत सहकार विभागाकडं ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. दरम्यान, नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात 2017 मध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 2021 मध्ये नाशिक विशेष न्यायालयानं त्यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img