20.1 C
New York

Narendra Modi : योग मानवतेला एका सुत्रात आणेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

Published:

सध्या जग युद्धाच्या उंबठ्यावर आहे. अशा काळात योगाची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योग सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे. (Yoga) या योगा आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरुवात योगाने करेल. या आंदोलनात सर्व समाज योगामुळे एकत्र येईल. योग मानवतेला एका सुत्रात आणेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी योगाचे महत्व सांगितले. नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करताना म्हणाले, योगाच्या प्रवासाकडे गेल्या दशकातील पाहताना मला अनेक गोष्टी आठवतात. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा, असा प्रस्ताव मांडला होता.

या प्रस्तावानंतर जगभरातील १७३ देशांनी आपणास पाठिंबा दिला. असा पाठिंबा मिळणे आजच्या जगात ही सामान्य गोष्ट नाही. हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता, तर तो मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता. आता ११ वर्षांनंतर आपण पाहतो की योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.

योगशास्त्राचा अभ्यास आपले दिव्यांग मित्र करतात हे पाहून मला अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त म्हणाले, शास्त्रज्ञ अवकाशात योग करतात. सिडनी ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असोत, एव्हरेस्टची शिखरे असोत किंवा समुद्राचा विस्तार असो, सर्वत्र एकच संदेश मिळत आहे. देशात लठ्ठपणाचा वाढत आहे. यामुळे तेलाचे प्रमाण लोकांनी जेवणातील १०% कमी करावे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img