मुसळधार पावसाचा (Heavy rain) तडाखा रायगड जिल्ह्यामध्ये सुरूच आहे. आज देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी (Kundalika river crosses danger level) ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी (Raigad) देण्यात आली आहे.
Heavy rain अतिमुसळधार पावसाची शक्यता
पावसाने मागील चार दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर धुमाकूळ घातलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने आज रायगडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळीकडे पाणीच पाणी साठलंय. याच पार्श्वभूमीवर रायगडमधील पाच तालुक्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. यासंदर्भात, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रक जारी केलंय.
Heavy rain शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
हवामान खात्याने रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झालीय. जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत 28 प्रकल्पामध्ये 60 टक्के पाणीसाठाअसलेल्या जमा झालाय. तर जिल्ह्यातील सुतारवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे, उन्हेरे, पाभरे, संदेरी खिंडवाडी, आणि खैरेही 9 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. फणसाड आणि वावा ही धरणे सुद्धा लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.