पालखी सोहळ्यांमुळे (Pune Palkhi) पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतूक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पालखी प्रस्थानाच्यावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जारी केले आहेत. 22 जून रोजी सासवड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे 2 वाजल्यापासून ते 24 जून रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे तसेच सासवडकडून ही वाहतूक पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.
24 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 25 जून रोजी रात्री 12 वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येणार आहे. लोणंद येथे पालखी मुक्कामी असून 26 जून रोजी या दिवशी पहाटे 2 वाजल्यापासून ते 26 जून रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. 26 जून ते 28 जून या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार आहे. या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.
Pune Palkhi श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल
पालखी 23 जून रोजी यवत येथे मुक्कामी आहे. पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक 23 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे.
24 जून रोजी यवत ते वरवंड दरम्यान वरवंड येथे पालखी मुक्कामी आहे. त्यामुळे 24 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
वरवंड ते उंडवडी दरम्यान 25 जून रोजी पालखी उंडवडी येथे मुक्कामी असणार आहे. त्यामुळे 25 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. 26 जून रोजी उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात पालखी मुक्कामी असणार आहे. बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता 26 जून रोजी या दरम्यान पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर या मार्गावरील वाहतूक येतील.
27 जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी आहे. पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत 27 जून रोजी जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.
28 जून रोजी सणसर ते अंथुर्णे दरम्यान निमगाव केतकी येथे पालखीचा मुक्कामी आहे. त्यामुळे 28 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 29 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे.
पालखीचा मुक्काम इंदापूर येथे आहे. त्यामुळे पहाटे 2 वाजल्यापासून ते 30 जून रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस -जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.
30 जून रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलूज-बावडा-नातेपुते बारामती तसेच अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. 30 जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गान वळविण्यात येणार आहे.
1 जुलै रोजी इंदापूर ते सराटी दरम्यान पालखी सराटी येथे मुक्कामी आहे. इंदापूर अकलूज रोडवरील वाहतूक पहाटे 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तसेच 3 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.