मुरबाडच्या सिद्धगडावर नवी मुंबईतून ट्रेकिंगसाठी आलेल्या (Siddhagad Fort) एका ग्रुपमधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस असल्यामुळे या तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले. साईराज धनेश चव्हाण (वय 21, रा. तळोजा, मूळगाव दहिगाव, सातारा) असं या मृत तरुणाचं नाव आहे.
साईराज चव्हाण हा रविवारी नवी मुंबईतील 14 जणांच्या ग्रुपसोबत सिद्धगडावर आला होता. मात्र,तोल जाऊन तो खोल दरीत किल्ल्यावर चढत असताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला. उर्वरित 13 जणांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांनी किल्ल्यावरुन सुखरुप खाली आणले. मात्र, साईराज चव्हाण याचा मृतदेह शोधण्यासाठी मुरबाड परिसरात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे दोन दिवस लागले.
मात्र, त्याचा मृतदेह रविवारी ते सोमवार सकाळपर्यंत सापडला नव्हता. अखेर सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह त्याचा मृतदेह दरीत दिसला. हा मृतदेह दरीतून वर आणणे मात्र, जोरदार पाऊस, डोंगरावरील निसरड्या वाटा आणि धुक्यामुळे कठीण होऊन बसले. दुपारी तीन वाजता साईराज चव्हाण याचा मृतदेह अखेर मंगळवारी दुपारी तीन वाजता साईराज चव्हाण याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आणि कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला.
साईराज चव्हाण हा अत्यंत धाडसी होता. त्याने आतापर्यंत अनेक किल्ले सर केले होते. त्याला भारतीय लष्करात जायचे होते. साईराजने अलीकडेच एनडीएची परीक्षा दिली होती. मात्र, थोड्या गुणांमुळे त्याचा प्रवेश हुकला होता. परंतु, भारतीय लष्करात जाण्याची इच्छा त्याची कायम होती. परंतु, मृत्यू झाल्यामुळे त्याचा हे स्वप्न अधुरे राहिले आहे. साईराजच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.