19.7 C
New York

FASTag Pass : 15 ऑगस्टपासून FASTag चा वार्षिक पास; गडकरींची मोठी घोषणा; किती पैसे लागणार?

Published:

15 ऑगस्टपासून FASTag बाबतच्या नियमात बदल होणार असून, आता वाहनचालक फास्टटॅगचा वार्षिक पास (FASTag Pass) बनवू शकणार आहेत. हा पास वार्षिक 3 हजार रूपयांचा असेल अशी मोठी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. हा पास ३,००० रुपयांचा असेल. वार्षिक पासच्या घोषणेमुळे लाखो खाजगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांचा प्रवास केवळ जलदच नाही तर, अधिक आरामदायी आणि तणावमुक्त होईल असे सांगितले जात आहे.

१५ ऑगस्ट २०२५ पासून खाजगी वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन इ.) ३,००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी केला जाईल. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. या पाससाठी लवकरच एक स्वतंत्र लिंक NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर आणि ‘हायवे ट्रॅव्हल अॅप’ वर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पासचे सक्रियकरण आणि नूतनीकरण सोपे आणि सोयीस्कर होईल असे गडकरी यांनी म्हटले आहे.

FASTag Pass नवीन पास सिस्टमचा काय फायदा होईल?

नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांशी संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणे आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सोपे करणे, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वादाचे प्रसंग टाळणे यासाठी होणार आहे.

FASTag Pass फास्टॅग म्हणजे काय?

फास्टॅग हे एक उपकरण आहे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे टोल पेमेंट थेट त्याच्याशी जोडलेल्या प्रीपेड खात्यातून करता येते. ते तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते आणि तुम्हाला रोख व्यवहारांसाठी न थांबता टोल प्लाझातून जाण्याची परवानगी देते. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार टॅग रिचार्ज/टॉप अप करावा लागतो.

FASTag Pass फास्टॅगचे फायदे

FASTag वापरण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या वापरामुळे वाहनचालकांना त्यांच्या टॅग खात्यात केलेल्या सर्व व्यवहारांसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस अलर्ट मिळतो. यामुळे वाहनचालकांना टोल पेमेंटसाठी रोख रक्कम जवळ बाळगावी लागत नाही. डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे फास्टटॅग खाते ऑनलाइन रिचार्ज करता येते. याशिवाय, ग्राहक FASTag ग्राहक पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे स्टेटमेंट पाहू शकतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img