19.5 C
New York

Air India flight  : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड; अमेरिकेहून मुंबईला येताना कोलकत्यात इमर्जन्सी लँडिंग

Published:

अहमदाबाद विमान अपघातानंतर हवाई (Air India flight)  सेवांबाबत बरीच खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान (Kolkata) तांत्रिक समस्येमुळे हाँगकाँगला परतावे लागल्यानंतर, दुसऱ्या एका विमानातही काही तांत्रिक समस्या निर्माण झाली, ज्यामुळे विमान रिकामे करावं लागलं. हे विमान अमेरिकेहून मुंबईला येत होते. परंतु, कोलकातामध्येच विमानात समस्या निर्माण झाली ज्यामुळे ते रिकामे करण्यात आलं.

Air India flight  इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर पहाटे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. फ्लाइट एआय १८० मध्यरात्रीनंतर सुमारे ००.४५ वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचलं. परंतु, डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईला जाणारे विमान उशिरा आले. त्यानंतर, सुमारे ०५.२० वाजता, फ्लाइटमधील सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर पडण्यास सांगण्यात आलं.

सोमवारी, एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे विमानाला परतावे लागले. एअर इंडियाच्या ड्रीमलायनर बोईंग विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यात तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे ते हाँगकाँगला परतावे लागले. या प्रकरणी एअरलाइनने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटलं आहे की, फ्लाइट क्रमांक एआय ३१५ ने हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे लँडिंग केलं, सर्व प्रवासी सुरक्षितपणे उतरले. नंतर फ्लाइटची तपासणी करण्यात आली.

Air India flight  ब्रिटिश एअरवेजच्या विमानातही बिघाड झाला

त्याचप्रमाणे, रविवारी चेन्नईला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग ड्रीमलाइनर विमानातही तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे ते मध्यरात्री लंडनला परतले. ब्रिटिश एअरवेजने सांगितलं की विमान सुरक्षितपणे उतरलं आणि क्रू मेंबर्स आणि प्रवासी आरामात बाहेर पडले. दरम्यान, अलिकडच्या काळात, विमान कंपन्या उड्डाणात कोणतीही समस्या आल्यास तात्काळ सतर्क होत आहेत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देत आहेत. गेल्या आठवड्यात, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर विमान कोसळले, ज्यामध्ये २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img