इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशात गेल्या पाच दिवसांपासून (Petrol-Diesel Price) भीषण युद्ध सुरू आहे. त्यात अमेरिका पडद्याआडून मोठी खेळी खेळत आहे. तेहरानवर अणूप्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी दबाव आहे. दोन्ही देशात युद्ध ताणण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर दिसून येईल. देशात इंधनाच्या किंमती युद्ध पार मध्य-पूर्वेत होत असले तरी भडकण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नांना हा मोठा सुरुंग मानण्यात येत आहे.
Petrol-Diesel Price भारताला स्वस्त इंधन मिळण्यात अडचण
भारताचे इस्त्रायल आणि इराण हे दोन्ही देश खास मित्र आहे. दोन्ही देशांशी चांगले संबंध असणाऱ्या मोजक्याच देशात भारत आहे. भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. रशियाप्रमाणेच इराण भारताला कच्चे तेल खरेदीत घसघशीत सूट, सवलत देतो. आता युद्ध सुरू असल्याने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कमी येण्याची, उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे. त्याचा थेट परिणाम क्रूड ऑईल आयातीवर होईल.
Petrol-Diesel Price इराणमधून आयात-निर्यात महागणार
आण्विक शस्त्र कार्यक्रमातून इराण जोपर्यंत मागे हटणार नाही तोपर्यंत अमेरिका इस्त्रायलच्या आड या देशाची अशीच नाकाबंदी करण्याची शक्यता आहे. इराणला उघड धमकीअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर सुद्धा दिली आहे. अमेरिका नवीन आर्थिक प्रतिबंध लावण्याची शक्यता आहे. कच्चा तेलासह ड्रायफ्रूटही इराणमधूनच भारतात येतात. तर बासमती तांदळासह, साखर, चहा-कॉफीची भारत इराणला निर्यात करतो. इराणमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक भारतीय कंपन्या या देशात सध्या कार्यरत आहेत. जर अमेरिकेने आर्थिक प्रतिबंध घातले तर भारतीय कंपन्यांना तिथे काम करणे अवघड होईल.