बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karishma Kapoor) एक्स पती संजय कपूर यांचे गुरुवारी (Sanjay Kapoor) रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 53 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. संजय कपूर त्यांच्या घरात पोलो खेळत होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला यात त्यांचा मृत्यू झाला. संजय कपूरने प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला होता. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठने एक्सवर ट्वि करत याबाबत माहिती दिली आहे. मृत्यूच्या काही वेळ आधीच संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघातावर (Ahmedabad Plane Crash) ट्विट केलं होतं.
संजय कपूर यांनी त्यांचं शेवटचं ट्विट अहमदाबाद विमान अपघातावरच केलं होतं. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी मिळाली. या अपघातातील पीडित कुटुंबांसोबत माझ्या प्रार्थना आणि संवेदना आहेत असे ट्विट त्यांनी केले होते. यानंतर काही वेळातच संजय कपूर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत लग्न केले होते.
Sanjay Kapoor 2003 मध्ये करिश्माशी विवाह
बिजनेसमन संजय कपूरने सन 2003 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी विवाह केला होता. परंतु, त्यांचं वैवाहिक आयुष्य कायम तणावाचंच राहिलं. लग्नानंतर या दोघांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुलं झाली. परंतु, सन 2014 मध्ये दोघेही विभक्त झाले होते. करिश्मा कपूरने संजयवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.