25.9 C
New York

Rice Export Decrease : एप्रिल-मे महिन्यात तांदळाच्या निर्यातीत 60 टक्के घट; कारणही हैराण करणारं..

Published:

भारत कृषिप्रधान देश आहे. परदेशात देशातील दीडशे कोटी लोकांचं पोट भरून अन्नधान्य निर्यात (Rice Export Decrease) केलं जातं. इतकी भारताची क्षमता आहे. धान्याच्या उत्पादनात आज देश स्वयंपूर्ण आहे. याचबरोबर निर्यातीतही (Rice Export) वाढ होत आहे. परंतु, भारताला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत धक्का बसला आहे. तांदळाच्या निर्यातीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक बाजारपेठेत तांदळाला मागणी कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारात तांदळाच्या किंमती निचांकी पातळीवर आहेत कारण खरेदीदाररांकडे तांदळाचा भरपूर साठा आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बीव्ही कृष्णा राव म्हणाले, मागील दोन महिन्यात तांदळाची निर्यात कमी राहिली आहे. 2024 मधील अंतिम तिमाही आणि 2025 मधील पहिल्या तिमाहीत भारत सरकारने निर्यातीवरील निर्बंध हटवले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी केली गेली होती. जानेवारी महिन्यात तर बंदरांवर तांदूळ ठेवण्यासाठीही जागा नव्हती आणि समुद्रात माल तरंगत होता.

दिल्लीतील व्यापार विश्लेषक एस. चंद्रशेखरन यांनी सांगितले, की भारतातील रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि जास्तीच्या साठ्याने जागतिक किंमती कमी राखल्या आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूप जास्त आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत दबाव वाढला आहे.

Rice Export Decrease आकडे काय सांगतात

उकडलेल्या तांदळाची निर्यात

सप्टेंबर 2024 : 4.35 लाख टन
ऑक्टोबर : 11.35 लाख टन
नोव्हेंबर : 10.13 लाख टन
डिसेंबर : 11.01 लाख टन
जानेवारी 2025 : 12.52 लाख टन
एप्रिल : 7.92 लाख टन
मे : 2.07 लाख टन

साध्या तांदळाची निर्यात

सप्टेंबर 2024 : 30 हजार टन
नोव्हेंबर : 6.91 लाख टन
डिसेंबर : 6 लाख टन
जानेवारी 2025 : 5.22 लाख टन
एप्रिल 2025 : 3.04 लाख टन
मे 2025 : 2.92 लाख टन

Rice Export Decrease पाच लाख टनही निर्यात नाही

आकडेवारी लक्षात घेतली तर स्पष्ट होते की निर्यात मागील दोन महिन्यात खूप कमी झाली आहे. दरवर्षी 16 ते 17 लाख मिलियन टन तांदळाची भारतातून निर्यात होते.म्हणजेच दर महिन्याला 1.3 ते 1.4 मिलियन टन. आता झालेली कपात खूप मोठी आहे, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. दिल्लीतील निर्यातदार राजेश जैन पहाडिया यांनीजागतिक बाजारात जास्तीचा पुरवठा झाल्याने मंदीचे वातावरण दिसून येत असल्याचे सांगितले.

Rice Export Decrease किंमतीत मोठी कपात

तुकड्यातील साध्या तांदळाचे भाव सध्या 384 डॉलर प्रतिटन असे आहेत. मागील पाच वर्षांत या किंमती सर्वात कमी आहेत. या दरम्यान उकडलेला तांदूळ (Parboiled Rice) 377 डॉलर प्रतिटन या दराने विक्री होत आहे. फेब्रुवारी महिन्यात तांदळाच्या किंमतीत 20 टक्क्यांनी कपात झाली आहे.

दरम्यान, भारतीय अन्न महामंडळाकडे 1 जून 2025 पर्यंत 37.99 मिलियन टन तांदूळ आणि 32.26 मिलियन टन धान्य (यात 21.61 मिलियन टन तांदूळ) साठा करुन ठेवले होते. गव्हाच्या उत्पादनात सन 2022 आणि 2023 मध्ये घट झाल्याने सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातली होती. 2024 मधील दुसऱ्या तिमाहीपासून तांदळाच्या साठ्यात वाढ होऊ लागली. त्यामुळे सरकारने निर्यातीवरील सर्व निर्बंध मागे घेतले होते. 2024-25 मध्ये भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला.

आता परिस्थिती थोडी बदलली आहे. जागतिक बाजारात तांदळाचा भरपूर साठा आहे. त्यामुळे किंमती कमी झाल्या आहेत. बांग्लादेशसारख्या शेजारी देशांनीही भारताकडून तांदूळ खरेदी कमी केली आहे. परंतु, तरीही बांग्लादेश आपल्या गरजेनुसार भारताकडून खरेदी करत असतो अशी माहिती चंद्रशेखरन यांनी दिली. तांदळाच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी मागणीत कोणतीही वाढ झालेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img