अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात परिस्थिती (Los Angeles Riots) चिघळत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या (Donald Trump) इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात अमेरिकेत आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अॅक्टिव्ह ड्यूटी मरीन तैनात करण्यात आले आहेत. यातच आता सोशल मीडियावर (Social Media Viral Video) एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात काही लोक अॅपल कंपनीच्या स्टोअरमध्ये लूटपाट (Apple Store Looting)करताना दिसत आहेत.
माहितीनुसार, सोमवारी रात्री काही तोंड झाकलेले लोक दुकानात घुसले. त्यांनी दुकानातील फोन आणि अन्य वस्तू लुटून नेल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचताच अनेक जण दुकानातून पळून जाताना दिसले. या घटनेचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. यात काही लोक हुडी आणि तोंड झाकून दुकानात तोडफोड करताना दिसत आहेत. एका इमारतीत बरेच लोक दिसत आहेत. यात एक व्यक्ती इमारतीतून पळून जाण्यासाठी खिडकी तोडताना दिसत आहे.
Los Angeles Riots आंदोलनांचं कारण काय
लॉस एंजेलिस शहरात मागील एक आठवड्यापासून आंदोलनं होत आहेत. राज्यात निर्वासित अभियान राबविण्यापासून अधिकाऱ्यांना रोखण्याचं काम आंदोलक करत आहेत. ट्रम्प सरकारने या प्रकारांना रोखण्यासाठी कर्फ्यू घोषित केला आहे. तसेच ठिकठिकाणी नॅशनल गार्ड मरीन तैनात केले आहेत. या निर्णयाचा राज्याच्या राज्यपालांनी विरोध केला आहे. राज्यपालांच्या विरोधाचा विचार न करता सरकारने आपला निर्णय पुढे रेटला आहे. त्यामुळे राज्यात ट्रम्प सरकार विरोधात असंतोषाचा भडका उडाला आहे.
Los Angeles Riots मरीन सैनिक नेमके कोण
सरकारने जे मरीने सैनिक तैनात केले आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या सैनिकांना गोरिला हल्ले, बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या प्रसंगात काय करायचं याची ट्रेनिंग दिली जाते. या सैनिकांना लोकांशी संवाद साधणे, त्यांची समजूत काढणे किंवा त्यांना रोखणे या गोष्टींची ट्रेनिंग दिलेली नसते. त्यामुळे अशा वेगळ्याच पद्धतीने ट्रेन केलेल्या मरीन्सना तैनात करणे म्हणजे सैनिक आणि नागरिक दोघांचाही जीव धोक्यात घालण्यासारखं आहे असे सांगितले जात आहे.
Los Angeles Riots डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध खटला दाखल
कॅलिफोर्निया सरकारने (California Govt) थेट राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातच खटला दाखल केला आहे. राज्यपालांची परवानगी न घेताच लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) नॅशनल गार्ड्स सैनिकांची तैनाती केली म्हणून हा खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढलेली हिंसा रोखण्यासाठी नॅशनल गार्ड्सनंतर मरीन तैनात करण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला आहे. यामुळे अमेरिकेत रस्त्यावरील लढाई उच्चपदस्थ अधिकाऱ्यांतही पोहोचली आहे.