महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन नारायण राणे नितेश राणेंचे (Nitesh Rane) वडील यांनीही मुलाचे कान टोचले आहेत. याप्रकरणा माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) काय म्हणाले, ते आपण पाहू या.
Narayan Rane नारायण राणे काय म्हणाले?
बाप म्हणणं चुकीचं आहे. मी याबद्दल त्याला बोललेलो आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या (Maharashtra Politics) जनतेचा सेवक असतो. कोणाचा बाप नसतो. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा लोकांना सांगायचो की मला साहेब म्हणू नका. मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. तीच समज मी नितेशला दिलेली आहे.
Narayan Rane नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान
नितेश राणे यांनी धाराशिव जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अपमान केला होता. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, धाराशिव जिल्ह्यात शिंदे सेनेचे नेते कितीही ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असले, तरी सर्वांचा बाप राज्याचे मुख्यमंत्री भाजप नेता (Devendra Fadanvis) आहे.
Narayan Rane निलेश राणे संतापले
नितेश राणेंच्या या विधानावर शिवसेना संतापली आहे. तर त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. निलेश राणे यांनी त्यांच्या धाकट्या भावाच्या विधानावर कडक स्वरात ट्विट केले की, “नितेशने काळजीपूर्वक बोलावे.. आपण भेटू तेव्हा मी त्याला नक्कीच सांगेन. पण बोलताना प्रत्येकाने सर्व काही लक्षात ठेवून बोलावे. जाहीर सभेत बोलणे सोपे आहे, परंतु तुमच्या बोलण्याने कोणाला फायदा होत आहे, हे देखील लक्षात ठेवावे. आपण महायुतीत आहोत हे विसरू नका, अशा शब्दांत त्यांनी नितेश राणेंना सुनावलं होतं.